मशरूम लागवड तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन | Mushroom Business Maharashtra
मशरूम शेती- कमी जागेत व कमी पाण्यात करता येईल असा उत्तम शेतीपूरक व्यवसाय परंतु अनेक गैरसमज व अफवा ह्यामुळे हा व्यवसाय काहीसा बदनाम झालाय. काय आहे मशरूम शेती बद्दल सत्य परस्थिती व कशी करावी मशरूम ची लागवड व विक्री हयाबद्दल सर्व माहिती ह्या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तावना: मशरूम ज्याला आपण मराठी मध्ये ‘ अळिंबी ’ असे देखील म्हणतो ही बुरशी गटात मोडणारी वनस्पति आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात मशरूम ला वेगवेगळी नावे देखील आहेत जशे कुत्र्याची छत्री , भूछत्र , तेकोडे , धिंगरी , सात्या , डुंबरसात्या , केकोळ्या इत्यादि. मशरूम चे उत्पादन घेण्यासाठी कमी जागा व कमी पाणी लागते आणि मशरूम ची मागणी ही भारतासह पूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जगभरामद्धे मशरूम चे व्यापारी तत्वावर मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मशरूम खाण्यासाठी स्वादिष्ट तर आहेच त्यासोबतच पौष्टिक देखील आहे. मशरूम मध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे , प्रथिने व खनिजे आहेत त्यामुळे दररोजच्या आहारात मशरूम चा वापर केल्यास फायदा होतो. मशरूम म...